

Indian Railway
ESakal
मुंबई : पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १६२ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उत्सवासाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांची संख्या ५८० झाली आहे. मुंबईहून बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह राजस्थान व दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.