

Railway Halts Gaming Zone Project
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावरील गेमिंग झोन उभारणीच्या कामांना रेल्वे प्रशासनाने स्थगिती दिली असून मैदान पुन्हा नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.