

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३०) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार-ठाणेदरम्यानच्या पाचव्या नाणि सहाव्या मार्गिकवर तसेच ठाणे-वाशी, नेरूळदरम्यानच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवांसह काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.