Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai Local Train: मुंबई लोकलची वाढती प्रवासीसंख्या पाहता रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी केल्या जाणार आहेत.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेची वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी)-३ आणि ३ अ अंतर्गत सुमारे १९,२९३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com