
रेल्वे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; ट्रॅकमॅन- की मॅन समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची पडापड!
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकमॅन आणि की मॅन यांना रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी आपल्या घर काम आणि कंत्राटदारांचा कामासाठी वापर करून घेत असल्याची धक्कादायक वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहे. रविवारी सुट्टी असल्याने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रॅकमॅन आणि की मॅन समस्या जाणून घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र, अद्यापही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुरक्षेची सर्वाधिक जबाबदारी रेल्वेच्या ट्रॅकमॅन आणि की मॅनवर असते; मात्र, गेल्या काही महिन्यापासून रेल्वेच्या ट्रॅकमॅनचे शोषण होत आहे. ट्रॅकमॅन गॅंगमनला रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंताकडून घर काम आणि खासगी कामासाठी वापर करून घेत आहे. इतकेच नव्हे तर, काय रेल्वेच्या कंत्राटदाराचे कामही ट्रॅकमॅनकडून घेतले जात आहे. त्यामुळे रेल्वे रुळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामा बोझा येत असल्याची तक्रार केली होती.
यासंदर्भात कामगारांनी सकाळकडे ही आपल्या व्यथा सुद्धा माडल्या होत्या. यासंदर्भातील वृत्त सकाळने रविवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सावधगिरीची भूमिका घेत पश्चिम रेल्वेने वरीष्ठ अधिकाऱ्यांना ट्रक मॅन, गॅंगमन आणि की मॅनच्या समस्यां जाणून घेण्याचे अंतर्गत आदेश दिले. त्यानंतर सुट्टीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रक मॅन, गॅंगमन आणि की मॅनला समस्यांबाबद विचारणा केली आहे. सकाळने पश्चिम रेल्वेच्या मुख्यजनसंपर्क अधिकारी यांना विचारले असतात, यासंदर्भात आम्ही माहिती मागितली आहे. माहिती आल्यास तुम्हाला सांगू.
अशा अधिकाऱ्यांना घरी बसवा-
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. रेल्वे मंत्रालयाचे आदेश असताना सुद्धा रेल्वे अधिकारीवर्ग सर्रासपणे ट्रॅकमन आणि की मॅनला घर काम आणि कंत्राटदारांचा कामासाठी वापर करून घेत आहे. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत. तसेच दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून घरी बसवावेत.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
रेल्वेमध्ये पूर्वीपासून अधिकारी वर्गाकडून चतुर्थी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे. कारवाईच्या भीतीपोटीं ट्रक मॅन आणि गॅंगमन तक्रारी करत नाही. आज कामगारांनी तक्रारी केल्या तर त्यांची दखल घेत नाही. हा रेल्वेचा कारभार फार गँभीर आहे. रेल्वे ट्रकची सुरक्षा ट्रक मॅन आणि गॅंगमनच्या खांद्यावर असते. मात्र, अधिकाऱ्यांचा त्रासामुळे मानसिक तणावाखाली ट्रॅकमन आणि गॅंगमन काम करत आहे. या प्रकरणाची पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊ कारवाई करावीत.
- नंदकुमार देशमुख,अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
रेल्वे ट्रक मॅन आणि की मॅननी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून एक महिन्या पूर्ण होत आहे. मात्र, पश्चिम रेल्वेला तक्रारीची भाषा कळत नाही आहे. आतापर्यंत या प्रकरणात रेल्वेकडून चौकशी आदेश दिले नाही. या आठवड्यात रेल्वेने या प्रकरणाच दखल घेतली नाही. आम्ही न्यायालयात जाणार आहोत-
- मंगेश खातून, माजी विभागीय अध्यक्ष, रेल्वे मजदूर युनियन
Web Title: Railway Authorities Issue Of Trackman Key Man Problem Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..