Passenger Shocked by OHE While Climbing mumbai Local Train
sakal
मुंबई - मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात लोकलच्या डब्यावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला ओव्हरहेड वायरचा (ओएचई) धक्का बसल्याने मंगळवारी सायंकाळी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. सुरक्षेच्या कारणास्तव ओएचईचा वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात आल्याने डाउन जलद मार्गावरील लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. परिणामी, कार्यालयातून घरी परतणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला.