रेल्वेकडून नवतंत्रज्ञानाचा वापर; घाट, बोगद्यात उपयोगी पडणार...

प्रशांत कांबळे
शुक्रवार, 10 जुलै 2020

अपात्कालीन परिस्थितीत लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संभाषणात अडथळा येतो. त्यामुळे मध्य रेल्वेने आता रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेत 17 बोगद्यांमध्ये ही यंत्रणा बसवले जाणार आहे. त्यामुळे संभाषणातील अडथळे दूर होणार असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गांवरील घाट रस्त्यांवरील बोगद्यांमध्ये अनेक वेळा दरड कोसळून अपघात आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना झाल्या आहे. या घाटांमध्ये नेटवर्कची समस्या असल्याने, अशा अपात्कालीन परिस्थितीत लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संभाषणात अडथळा येतो. त्यामुळे मध्य रेल्वेने आता रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेत 17 बोगद्यांमध्ये ही यंत्रणा बसवले जाणार आहे. त्यामुळे संभाषणातील अडथळे दूर होणार असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. 

कोरोनाच्या संकटात पालिकेला मदत करा, CMनी कोणाकडे मागितली मदत

मध्य रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फायबर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट स्टिस्टमने तयार केलेला माइक्रोवेब टॅावर अर्थात लिकी केबल कर्जत ते लोणावळ्या दरम्यानच्या बोगदा क्रमांक 49 मध्ये लावला होता. आता ही अत्याधुनिक यंत्रणा घाट विभागातील 17 रेल्वे बोगद्यांमध्ये बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये रेल्वेचे गार्ड, लोको पायलट यांना जवळच्या स्टेशन मास्तरशी तात्काळ संपर्क करता येणार आहे. 

अदानी वीज ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता असं भरता येणार वीज बिल 

मध्य रेल्वे गेल्या दोन वर्षांपासून नेटवर्कची समस्या दूर व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. आता मध्य रेल्वेने यावर मार्ग काढताना रेडिओ तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. ते आता घाट विभागातील आणखी 17 बोगद्यांमध्ये अत्याधुनिक लिकी केबलची यंत्रणा बसवणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेत आकणी वाढ होणार आहे.

कोविड रुग्णालयांंवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च; वाचा 'एमएमआरडीए' प्रशासनाची माहिती

पावसाळ्यात विशेष फायदा 
नोव्हेंबर 2019 मध्ये मध्य रेल्वेवरील सर्वप्रथम बोर घाटात मंकी हिल ते खंडाळा दरम्यानच्या सर्वात मोठ्या बोगद्यात ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर बसविली होती. त्यासाठी 2 कोटी 47 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीचा रेल्वेला फायदा होत असल्यामुळे आता आणखी 17 बोगद्यात ही प्रणाली बसवण्यात येणार आहे.  ही यंत्रणा खासकरून भूमिगत खाणी आणि लेण्यांमध्ये वापरली जाते. रेडिओ तंत्रज्ञान कोणत्याही हंगामात उपयुक्त ठरते. यामध्ये बोगद्यात एक केबल टाकली जात असून त्यातून रेडिओ लहरी उत्सर्जित होतात.त्यामुळे संवाद साधताना कोणताही अडथळा येत नाही.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway department uses radio transmission technology for communication in tunnel and ghats