esakal | एसी लोकलचे तिकीट दर 31 मेपर्यंत जैसे थे 
sakal

बोलून बातमी शोधा

एसी लोकलचे तिकीट दर 31 मेपर्यंत जैसे थे 

पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या तिकीट दरात येत्या 24 मे पासून वाढ करण्यात येणार होती.

एसी लोकलचे तिकीट दर 31 मेपर्यंत जैसे थे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या तिकीट दरात येत्या 24 मे पासून वाढ करण्यात येणार होती. रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय किमान काही दिवसांकरिता का होईना मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. 

डिसेंबर 2017 पासून उपनगरीय मार्गावरील देशातील पहिली एसी लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलच्या तिकीट दरात 25 जून 2018 पासून वाढ करण्यात येणार होती. परंतु तेव्हा 6 महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून भाडेवाढ होण्याचे संकेत होते. परंतु रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा भाडेवाढीला 4 महिने स्थगिती दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एसी लोकलचे तिकीट दर 31 मे पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. 

चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतात. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकीट जीएसटीसह 60 रुपये; तर कमाल तिकीट 205 

रुपये ठेवण्यात आले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात एसी लोकलमुळे 19 कोटी रुपयांचा महसूल पश्‍चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेला आहे; तर एकट्या एप्रिल महिन्यात 1 कोटी 84 लाखांचा महसूल प्राप्त झालेला आहे. 

जादा थांब्यामुळे महसुलात वाढ 
पश्‍चिम रेल्वेच्या 1 नोव्हेंबर 2018 पासून लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकात एसी लोकलच्या थांब्यात वाढ केलेली आहे. त्यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मिरा रोड, नायगाव आणि नालासोपारा स्थानकांचा समावेश आहे. एसी लोकलच्या थांब्यात वाढ केल्यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या महसुलात वृद्धी झाली आहे. 

loading image
go to top