Railway News: पनवेल-नांदेड दरम्यान ४० समर स्पेशल गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

railway
railwaysakal

Railway News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते नांदेड दरम्यान नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त ४० उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पनवेल ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०७६२६ पनवेल-हुजूर साहेब नांदेड उन्हाळी विशेष गाडी २३ एप्रिल २०२४ ते २७ जून २०२४ पर्यंत दर मंगळवार आणि गुरुवारी दुपारी २.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता हुजूर साहेब नांदेड येथे पोहोचेल.

railway
Railway News: भारतीय रेल्वेच्या विक्रम; यंदा ९१११ उन्हाळी विशेष ट्रेन!

ट्रेन क्रमांक ०७६२५ हुजूर साहेब नांदेड - पनवेल उन्हाळी विशेष गाडी २२ एप्रिल २०२४ ते २६ जून २०२४ पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी रात्री ११ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. (Nanded - Panvel Summer Special Train)

यादोन्ही उन्हाळी विशेष गाड्याना कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.(Kalyan, Igatpuri, Nashik, Manmad, Nagersol, Rotegaon, Lasur, Aurangabad, Jalna, Partur, Selu, Manawat, Parbhani and Purna)

railway
Railway News: मुंबई ते गोरखपुर-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com