
मुंबई : रेल्वेच्या फलाट तिकिटाचे दर वाढले...
मुंबई : मुंबई महानगरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, रेल्वे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने फलाट तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटदरात 10 रुपयांवरून 50 रुपये फलाट तिकीट केले आहे.
अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी फलाट तिकीतची वाढ केली गेली आहे. एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या 332 घटना घडल्या. अनेक जणांनी कोणतेही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. परिणामी अनेक एक्स्प्रेस उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने रेल्वे फलाट तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 9 मे 2022 ते 23 मे 2022 पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांऐवजी 50 रुपयांना मिळणार आहे.
Web Title: Railway Platform Ticket Prices Increased Rs 10 Platform Ticket To Rs 50 Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..