स्थलांतरितांना घरी सोडण्यात रेल्वेने बजावली सारथ्याची भूमिका.. वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

विशेष रेल्वेगाड्यांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे 1 मे पासून श्रमिक विशेष गाड्या सोडल्या होत्या.

मुंबई : विशेष रेल्वेगाड्यांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे 1 मे पासून श्रमिक विशेष गाड्या सोडल्या होत्या, त्या आतापर्यंत सुमारे 600 श्रमिक स्पेशल गाड्या मध्य रेल्वेकडून देशभरातील विविध राज्यात चालविण्यात आल्या असून, प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचवण्यासाठी रेल्वे यशस्वी ठरल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. 

वाचा ः आयआयटी मुंबईने मिळवला देशात पहिला क्रमांक; नेमकं कुठे वाचा सविस्तर... 

राज्य सरकारच्या विनंतीनुसार, श्रमिक विशेष रेल्वेगाडी मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील विविध स्थानकांमधून सुरू करण्यात आली होती. रेल्वेगाडी (रॅक) तयार करणे, स्वच्छता करणे, त्या रॅक्सची देखभाल करणे, कर्मचार्‍यांची आवश्यकता पूर्ण करणे, अन्नाची तरतूद करणे, राज्य सरकारांशी समन्वय करणे, सुरक्षित, वेळेवर ट्रेन संचालन आणि एकंदरीत मिशन बॅक होम ही  कोविड-19 या परिस्थितीत एक मोठे आव्हान होते. मात्र, रेल्वेने हे यशस्वी पार पाडले आहे. 

वाचा ः पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

या राज्यांसाठी धावल्या श्रमिक रेल्वे
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोरम, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलगाना, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. 

या राज्यात प्रथमच मध्य रेल्वे पोहचली
प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी परत पाठविण्याच्या मिशन बॅक होम ऑपरेशन किंवा ट्रेन ऑपरेशनमध्ये मध्य रेल्वेकडून जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये प्रथमच थेट रेल्वे सेवा देण्यात आली आहे. 

वाचा ः ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

सर्वाधिक श्रमिक ट्रेन मुंबई विभागातील
आतापर्यंत चालविण्यात आलेल्या एकूण गाड्यांपैकी  66 टक्के गाड्या मुंबई विभागामार्फत जवळपास 23 टक्के पुणे विभाग आणि सुमारे 11 टक्के सोलापूर, भुसावळ व नागपूर विभागांतर्फे चालविण्यात आल्या. जास्तीत जास्त गाड्या मुंबई विभागामार्फत चालविल्या जात असताना इतर चार विभागांनी मागणीत वाढ झालेल्या दिवसात त्यांच्या डेपोत 8-9 रॅक राखून ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway plays important role to travel starnded migrant across the country