ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

फेसबुक, इन्स्टाग्रामच्या टाईमलाईनवर स्टोरी स्वरुपात वेगवेगळे अपडेट्स आपण शेअर करत असतो. तशाच पद्धतीचं नवं अपडेट ट्विटरवरही येत आहे.

मुंबई ः फेसबुक, इन्स्टाग्रामच्या टाईमलाईनवर स्टोरी स्वरुपात वेगवेगळे अपडेट्स आपण शेअर करत असतो. तशाच पद्धतीचं नवं अपडेट ट्विटरवरही येत आहे. ब्राझिल आणि इटलीनंतर ट्विटरचं नवं फिचर ‘फ्लीट्स’ लवकरच भारतात सुरू होत आहे. ट्विटरचं हे नवीन फिचरमध्ये युजर्सना त्यांनी स्टोरी स्वरुपात शेअर केलेसे अपडेट्स 24 तासांनंतर दिसेनासे होतात. ही सुविधा लवकरच नव्या अपडेटमध्ये येणार असून ते अॅण्ड्रॉईड आणि आयओएसवरील उपलब्ध होणार आहे.

वाचा ः कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे

कसं वापराल हे फीचर ः 

  •  नवीन फ्लीट तयार करण्‍यासाठी तुमच्‍या प्रोफाइलच्‍या वरील डाव्‍या बाजूस असलेल्‍या अवतारावर टॅप करा.
  • फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्‍यासाठी टायपिंग सुरू करा किवा मीडिया आयकॉनवर टॅप करा.
  •  पोस्‍ट करण्‍यासाठी 'फ्लीट'वर टॅप करा.
     

एखाद्या व्‍यक्‍तीचे 'फ्लीट' पाहण्‍यासाठी :

  • व्‍यक्‍तींचे नवीन फ्लीट्स पाहण्‍यासाठी अवतारावर टॅप करा.
  • नवीन फ्लीट्स, तसेच जुने फ्लीट्स पाहण्‍यासाठी खाली स्‍वाइप करा.
  • तुम्‍ही फॉलो करत असलेल्‍या इतर अकाऊंट्समधील फ्लीट्स पाहण्‍यसाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्‍वाइप करा.

वाचा ः लातूरसारखं कोकणात किल्लारी पॅटर्न अशक्य? पवारांनी दिलं 'हे' उत्तर

ट्विटर हे युजर्सना आपल्या सभोवताली घडणाऱ्या अपडेट्सची माहिती देणारे आणि त्‍याबाबत चर्चा करण्‍यासाठी सुविधा देणारे महत्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ब्राझिलमध्‍ये फ्लीट्सची चाचणी सुरू केल्‍यापासून ट्विटरवर नेटकरी त्‍यांच्‍या मनातील विचार निःसंकोचपणे शेअर करताना दिसत आहेत. सतत ट्विट न करणारे लोक फ्लीट्सच्या माध्यमातून अधिक संवाद साधू लागले आहेत. ब्राझिल आणि इटलीनंतर हे भन्नाट फीचर आम्ही भारतात आणत असल्याचे ट्विटर ग्रुप प्रॉडक्‍ट मॅनेजर मो अलाधम यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tweeter new update fleets will able to share your stories