esakal | मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक | Railway Mega block
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Mega block

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी (ता.१०) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर (western railway) शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल; परंतु रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

हेही वाचा: मुंबई : आमदार निवासाच्या पुनर्विकासातील अडथळा दूर

कुठे : ठाणे-दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅकदरम्यान मुलुंडहून डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल दिवा स्थानकापर्यंत जलद मार्गावर धावतील. या लोकल ठाणे आणि दिवा येथे थांबा घेतील; तर कल्याणहून अप दिशेकडे जाणाऱ्या लोकल दिवा, मुलुंडदरम्यान जलद मार्गावर धावतील. या लोकल दिवा आणि ठाणे येथे थांबा घेतील. मुलुंड नंतर धिम्या लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.

कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत; नेरूळ- खारकोपर सेवा रद्द राहतील)
कधी : सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील. पनवेल-ठाणे अप आणि डाऊन मार्गावरील ट्रान्स हार्बर मार्गावरील, नेरूळ-खारकोपर अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहील.
ब्लॉक कालावधीदरम्यान बेलापूर- खारकोपर दरम्यान लोकल सेवा वेळापत्रकानुसार चालतील.
ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीदरम्यान ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

कुठे : बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी-रविवारच्या रात्री १२.४० ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅकवेळी अप दिशेकडील धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोडहून बोरिवली/गोरेगावपर्यंत जलद मार्गावर धावतील. सर्व विरार दिशेकडील डाऊन धिम्या लोकल गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकादरम्यान डाऊन फास्ट मार्गावर धावतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी, (ता.१०) रोजी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

loading image
go to top