esakal | रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक
sakal

बोलून बातमी शोधा

Railway megablock

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी (ता.12) रोजी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते मानखुर्द (CSMT to Mankhurd) दरम्यान विशेष लोकल सेवा (special train) चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लाॅकच्या वेळी सकाळी 10 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. रविवारी (Sunday), (ता.12) रोजी पश्चिम रेल्वेवर (western railway) कोणताही ब्लाॅक घेतला जाणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा: Sakinaka rape case: विकृत वृत्तीला रावणाप्रमाणे जाळाच!

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकावर थांबेल.

कुठे : हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन

कधी : सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील.

loading image
go to top