
उरण : औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या उरण तालुक्यात रेल्वेसेवा सुरू होऊन दीड वर्षेही झाले नसताना चारही रेल्वेस्थानके समस्यांच्या विळख्यात सापडली आहेत. रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून, गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.