goods transport train
goods transport trainsakal media

Western Railway: रेल्वेकडून २.६० कोटी टन अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक

Published on

मुंबई : पश्चिम रेल्वेद्वारे (Western Railway) माल आणि पार्सल विशेष ट्रेनमधून अत्यावश्यक सामग्रीची (Essential Goods transport) वाहतूक केली जाते. त्यामुळे 1 एप्रिल ते 25 जुलैपर्यंत या कालावधीत एकूण 2.60 कोटी टन अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक केली आहे. मागीलवर्षी याच कालावधीत 2.42 कोटी टन मालवाहतूक (Goods transport) केली होती. त्यामुळे, यंदाच्या वर्षात 28 टक्के अधिक मालवाहतूकीमध्ये वाढ झाल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. ( railway transport 2.60 crore tons in last four months-nss91)

पश्चिम रेल्वेच्यावतीने अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक सुरू आहे. याद्वारे मागील चार महिन्यात 240 पार्सल विशेष ट्रेनमधून 90 हजार टनाहून अधिक सामग्रीची वाहतूक केली आहे. यामध्ये शेतीला लागणारी सामग्री, औषधे, ऑपरेशनची सामग्री, मासे दूध याची वाहतूक केली. यामधून पश्चिम रेल्वेला 30.69 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर, पश्चिम रेल्वेद्वारे 40 हजार टनाहून अधिक दूधाची वाहतूक करण्यासाठी 58 मिल्क विशेष ट्रेन चालविल्या. तसेच 70 कोव्हिड-19 विशेष पार्सल ट्रेन चालवून 12 हजार टन अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक केली.यासह 20 हजार 500 टन वजनी 42 इंडेंटेड रेक चालविण्यात आल्या.

goods transport train
गाडीला कट मारल्याच्या रागातून ड्रायव्हरला बेसबॉलच्या बॅटने मारहाण, वसईतील घटना

1 एप्रिल ते 25 जुलैपर्यंत 70 किसान रेल्वे चालवून 17 हजार टन शेतीची सामग्रीची वाहतूक केली. याच कालावधीमध्ये मालवाहूकीच्या 94 हजार 73 रेक चालविण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या नंदुरबारमधील गुड्स शेडमधून साखरची वाहतूक करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे मंडळाने सुरू केलेल्या ​बिझनेस डेव्हलपमेंट​मुळे मालपुरवठा ग्राहकांशी संपर्क अधिक वेगवान, विश्वसनीय, फायदेशीर झाले आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com