रेल्वेचीही आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल; शुन्य उत्सर्जनाचे लक्ष साध्य करण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

रेल्वेचीही आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल; शुन्य उत्सर्जनाचे लक्ष साध्य करण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

मुंबई ः भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पनांची सुरुवात झाली असून, उर्जेच्या गरजेसाठी स्वावलंबी होण्याचा रेल्वे प्रयत्न करीत आहे. रेल्वेने 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे मोठ्या प्रमाणातील परिवहन नेटवर्क साध्य करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या समन्वयामुळे  मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी देशातील काही भागात नविन वाहने पाठविण्यासाठी रेल्वेचा वापर करने सुरू केले आहे.  

वस्तू ,पार्सल क्षेत्रातील रेल्वेचा वाटा वाढविण्यासाठी तयार केलेल्या व्यवसाय विकास युनिट्स ने उद्योग आणि क्षेत्रनिहाय दोन्ही आवक - जावक साहित्याचा डेटा संकलित केला आहे. मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याशी समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीमुळे वाहने जास्त प्रमाणात लोड झाली आहे. प्लांटमध्ये तयार झालेले नवीन वाहनांना देशातील विविध शहरांमधील डिलर्सकडे नेण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बतत होत आहे.

विशिष्ठ रॅकमधून ही वाहने पाठवली जातात. अशा एका रेकमध्ये 118 वाहने नेऊ शकतात तर नवीन उच्च क्षमता असलेली बीसीएसीबीएम रेल्वे वाघिणीची रेक अंदाजे 300 वाहने वाहून नेऊ शकते. सध्या, रेल्वे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी न्यू मॉडिफाइड गुड्स  रॅक आणि खाजगी मालकीचे बीसीएसीबीएम रॅकचा वापर करते. वाहूकीची वेळ कमी करण्यासाठी या रॅक्सच्या वाहतुकी वर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यानंतर पुढील लोडिंगसाठी हे रॅक्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचे समाधान होत आहे.  

या कंपन्याच्या वाहनांची ही वाहतूक
राज्य मोठे ऑटोमोबाईल हब आहे. यामध्ये महिंद्र, टाटा, फोर्ड, पियाजिओ, बजाज इत्यादी कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद भागात वाहने तयार करतात. महाराष्ट्रात उत्पादित वाहने (ऑटोमोबाईल) देशाच्या विविध भागात नेण्याची बरीच क्षमता आहे. मेसर्स टाटा मोटर्स व इतर वाहन कंपन्यांसमवेत व्यवसाय विकास युनिट्सच्या बैठका घेतल्या गेल्या आहेत आणि वाहतुकीसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.  मेसर्स मारुतीनेही या आर्थिक वर्षात फ्रेट ट्रेनचा वापर करून देशभरातून 1.78 लाख मोटारींची वाहतूक 5 लोडिंग टर्मिनल्सवरून नागपूर व मुंबईसह 13 टर्मिनलवर केली आहे.

---------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com