Mumbai News : 'सुहागरात एक्स्प्रेस' प्रकरणात रेल्वेची कारवाई; फर्स्ट एसी कुपे सजावटीप्रकरणी मुख्य तिकीट तपासनीस निलंबित

नांदेड-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कुपेमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी करण्यात आलेल्या सजावटीच्या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने घेतली गंभीर दखल.
Crime

crime

ESakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - नांदेड-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कुपेमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी करण्यात आलेल्या सजावटीच्या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कर्तव्यावरील मुख्य तिकीट तपासनीस (सीटीआय) गिरीश कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, संपूर्ण घटनेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर शिस्तभंगाची पुढील कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com