

Thane Mulund New Station
ESakal
ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे रखडलेले काम आता रेल्वे करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना सांगितले की, रेल्वे त्यांच्या अखत्यारीतील सर्व कामे स्वखर्चाने तात्काळ सुरू करेल. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन शहरी रेल्वे स्थानकाच्या कामात होणाऱ्या विलंबाबद्दल संसदेतील शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करत होते.