esakal | मुंबईत परतीचा पाऊसाला सुरुवात ?
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

मुंबईत परतीच्या पाऊसाला सुरुवात ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मान्सूनचा जोर ओसरला असून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.हे सर्व परतीच्या पावसाचे संकेत असल्याची माहिती हवामान विभागाचे के एस हिसळीकर यांनी सांगितले. विदर्भातील काही भागातून आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह राज्यभरात पुढील आठ दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देखील राज्यभरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मुंबईसह ठाणे,पालघर,रायगड आदि भागात यामुळे येत्या दोन दिवसात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती तयार झाली असून पुढील आठवडाभर राज्यात ही स्थिती कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. परतीचा पाऊस आणि कमी दाबाचा पट्टा या दोन्ही चा एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.

शनिवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील बहतेक भागातून माघार घेतली आहे. राज्यात पुढील काही दिवस तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शक्यतो ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. परतीचा पासून शक्यतो संध्याकाळी काही काळ कोसळतो. यादरम्यान वाऱ्यासह ढगांचा गडगडाट ही होतो. हा पाऊस अर्धा ते पाऊण तास कोसळतो.

loading image
go to top