
विरार : विक्रमगड क्षेत्रात पावसाने नियमित हजेरी लावल्याने २२ जून, २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता देहरजी धरणातील पाण्याने ५.१४७ दशलक्ष घनमीटरची (एमसीएम) पातळी गाठली. या धरणाच्या एकूण ९५.६० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या ५% इतके हे धरण भरले आहे. धरणाच्या जलसाठ्याची सापेक्ष पातळी ९०.०० मीटरपर्यंत वाढली. त्यामुळे स्पिलवेवर १०९.१४ दशलक्ष घनमीटर/सेकंद या गतीने विसर्ग करण्यात आला. धरणात पाणी साठण्याची ही पहिलीच वेळ होती आणि यातून धरणाची कार्यक्षमता तसेच त्याच्या बांधकामाचा भक्कमपणा सिद्ध झाला आहे. धरणाच्या ९० मीटर सापेक्ष पातळीपर्यंत अंशतः जलसाठा निर्माण झाला आहे. या ठिकाणी नदीच्या तळाच्या ६६.३६ या सापेक्ष पातळीशी तुलना करता धरणामध्ये सुमारे २३.६४ मीटर इतकी पाण्याची सापेक्ष खोली साध्य करण्यात आली आहे.