Vidhan Sabha 2019 : पावसामुळे मतदानाचा टक्का घसरणार ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय

सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

जोरदार पावसासोबत विजांच्या कडकडाटासोबत वाऱ्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. पुढचे तीन दिवस मुख्यत्वे मुंबई कोकणात पावसाचा अंदाज तर आहेच, पण त्यासोबत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय.

आणखी वाचा :: मुंबईसाठी का आहेत पुढचे चार दिवस धोक्याचे ? 

राज ठाकरे यांच्या पहिल्याच सभेवर पावसाने पाणी फेरलं. शेवटच्या दिवशीच्या अमित शाह यांच्या अकोले आणि कर्जत जामखेड इथल्या सभादेखील रद्द खराब हवामानामुळे रद्द झाल्यात. पावसामुळे उद्धव ठाकरे यांची सभा पण रद्द झालीये. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमोल कोल्हे यांचीही सभा रद्द झाल्याचं आपल्याला ठाऊक आहे. पावसामुळे अनेक नेत्यांना आपल्या आवरत्या घ्याव्या लागल्यात. कालची शरद पवारांची पावसातली भिजत केलेली सभा सभाही आपण सर्वांनी पहिली.

पुढील काही दिवस वर्तवल्या गेलेल्या पावसाच्या अंदाजामुळे आता, पावसाचा परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होणार का ? हे पाहावं लागेल.

WebTitle : rain in maharashtra might result in reduced percentage of voters


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in maharashtra might result in reduced percentage of voters