राज्यात आठवडाभर पावसाच्या हलक्या सरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरातील पट्टा विरल्यामुळे आता राज्यात आठवडाभर दमदार पाऊस राहणार नाही. बुधवारीही मुंबई, ठाणे वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक तर मध्य महाराष्ट्रात पुणे व साताऱ्यातही मुसळधार पावसाचीही शक्यता धुसर आहे.

गेल्या बुधवारपासून संपूर्ण कोकणपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला. मध्य महाराष्ट्रात पुण्यात, माथेरानमध्येही पावसाचा जोर दिसून आला. मात्र, आता या आठवड्यातून पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात झाली आहे. पावसासाठी आवश्यक गुजरातजवळील द्रोणीय स्थितीही क्षीण झाली आहे. त्यामुळे कोकणात व मध्य महाराष्ट्रात बुधवारी पावसाचा जोर असल्याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने 'वेट एण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात आता पावसाची शक्यता फारस धूसर आहे. शनिवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात केवळ हलक्या सरी कोसळतील. पुढच्या आठवड्यात पुन्हा कोकणात पावसाला सुरवात होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Mumbai in Week