esakal | Mumbai Rains : मुंबईत पावसाचा पुन्हा 'श्रीगणेशा'
sakal

बोलून बातमी शोधा

Rain starts in Mumbai again

मुंबईत ऐन श्री गणेशाच्या आगमनासोबतच पावसाने सुरुवात केल्याने पावसाच्या सरींसोबतच बऱ्याच ठिकाणी बाप्पाचं आगमन झालं. मात्र, वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करणाऱ्या गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड झाला. असं असलं तरी गेल्या महिनाभर मुंबईत वाढलेल्या उष्म्यामुळे हैराण झालेला मुंबईकर काहीसा सुखावला.

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा पुन्हा 'श्रीगणेशा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या महिनाभर उघडीप घेतलेल्या पावसाने काल पासून पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहर भागासह पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. ऐन श्री गणेशाच्या आगमनासोबतच पावसाने सुरुवात केल्याने पावसाच्या सरींसोबतच बऱ्याच ठिकाणी बाप्पाचं आगमन झालं. मात्र, वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करणाऱ्या गणेश भक्तांचा काहीसा हिरमोड झाला. असं असलं तरी गेल्या महिनाभर मुंबईत वाढलेल्या उष्म्यामुळे हैराण झालेला मुंबईकर काहीसा सुखावला.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला. याआधी कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. यातील बरेच खड्डे भरायचे बाकी असल्याने सायन-पनवेल महामार्गावर काहीशी वाहतूक कोंडी झाली. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर निघालेल्या मुंबईकरांना याचा फटका बसला. पाऊस पडला की अनेक ठिकाणी पाणी साचतं यावेळी मात्र मुंबईत पाणी साचण्याच्या फारशा तक्रारी आल्या नाहीत. बेस्ट वाहतूक ही सुरळीत सुरू असून तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक वेळेवर धावत आहे.

मुंबईत गेल्या चोवीस तासात कुलाबा 80 मीमी तर संताक्रूज 131.4 मीमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील चोवीस तासात शहरात पावसाची संततधार सुरूच राहील तर उपनगरांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

loading image
go to top