तब्बल पाच दिवसांनंतर नवी मुंबई शहरात पावसाची विश्रांती; सफाई कामगारांची लगबग

शरद वाघदरे
Saturday, 8 August 2020

 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाने वादळी वाऱ्यासर, विजेच्या कडकडाटाने दमदार हजेरी लावली. मागील पाच दिवसांपासून संततधार सुरू असणाऱ्या पावसाने मात्र शनिवारी उसंत घेतल्याचे दिसून येत होते.

वाशी  : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाने वादळी वाऱ्यासर, विजेच्या कडकडाटाने दमदार हजेरी लावली. मागील पाच दिवसांपासून संततधार सुरू असणाऱ्या पावसाने मात्र शनिवारी उसंत घेतल्याचे दिसून येत होते. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात चांगला गारवा निर्माण झाला आहे.

मुसळाधार पावसामुळे शहरातील स्वच्छतेचे काम रखडले होते. त्यामुळे रस्त्यांची सफाई शनिवारी पालिका कर्मचाऱ्यांनी केली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या पडलेल्या फांद्या कर्मचाऱ्यांनी साफ केल्या.

विमान दुर्घटनेची बातमी आली आणि साठे कुटुंबियांच्या पायाखाची जमीन सरकली...

मात्र सततधार सुरु असणाºया पाऊसामुळे साफसफाई करण्यात आली नव्हती. त्या रस्त्यांची साफसफाई शनिवारी सकाळपासून पालिका कर्मचारी करताना दिसून येत होते. वादळी वांºयामुळे झाडांच्या फांद्याा या रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्या देखील पालिकेच्या साफसफाई कर्मचांºयाकडून उचलण्यात येत होते. पाऊसाने उसंती घेतल्यामुळे दुकांनाच्या बाहेर असणाºया मोकळ्या जागेत दुकानदारांनी आपले बस्तान मांडले होते. एपीएमीसीमार्केटमध्ये मागील चार दिवसांपासून पावसांमुळे व्यापारी व ग्राहक फिरकत नव्हते. मात्र शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली.  जोरदार पावसामुळे नवी मुंबईकर घरांबाहेर पडले नव्हते. पाऊस कमी झाल्याने रस्त्यावर गर्दी पाहवायास मिळत होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, 'या' यादीत मिळवलं 'टॉप 5' मध्ये स्थान...

मोरबे धरणांच्या पाणी पातळीत वाढ
नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरणातील पाण्याचा गेल्या तीन वर्षापासून भरून विसर्ग होत आहे. यंदा धरणांच्या पातळीत धीम्या गतीन वाढ होत  आहे. 5 ऑगस्ट रोजी धरणांची पातळी 77.03 होती. मात्र पाच दिवसांत सततधार सुरु असणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पातळीत दोन मीटरने वाढ झाली असून 8 ऑगस्ट रोजी धरणांची पातळी 79.05 मीटर झाली आहे. धरण पुर्ण भरण्यासाठी धरणांची पातळी 88 मीटर होणे आवश्यक आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain stops in Navi Mumbai after five days; Almost cleaners