Mumbai Rain : मुंबईसह डोंबिवली, ठाण्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

rain Update mumbai thane navi mumbai dombivali havy rain
rain Update mumbai thane navi mumbai dombivali havy rain

डोंबिवली : डोंबिवलीत दुपारी 1 वाजल्यापासून दमदार पाऊस सुरु असून दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. तसेच वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. यामुळे नांदिवली, केळकर रोड, डोंबिवली स्टेशन परिसर इत्यादी भाग जलमय झाला होता.

दरम्यान मुंबई ठाणे डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरात जोरदार पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. तसे ठाणे, नवी मुंबई, मध्य मुंबईबरोबरच पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादर, एलफिस्टनसारख्या भागांमध्ये पाणी साचू शकतं असे देखील सांगण्यात आलं आहे.

rain Update mumbai thane navi mumbai dombivali havy rain
Live Updates: दसरा मेळाव्यावरून नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीत टीका

IMD ने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला असून शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस ठाणे, रायगड, पालघर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धुळे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.

सोबतच मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला असून विदर्भासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा हे चार जिल्हे वगळता राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

rain Update mumbai thane navi mumbai dombivali havy rain
Nobel Peace Prize: मानव हक्क अधिवक्त्यासह युक्रेन-रशियन संघटनांना शांततेचा नोबेल जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com