Ales Bialitsky
Ales Bialitsky

Nobel Peace Prize: मानव हक्क अधिवक्त्यासह युक्रेन-रशियन संघटनांना शांततेचा नोबेल जाहीर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाला पुरस्कार

NobelPeacePrize2022: बेलारूसमधील मानवाधिकार अधिवक्ता अॅलेस बिलियात्स्की तसेच रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना जाहीर झाला आला.रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Nobel Peace Prize 2022 Human Rights Activist Ales Bialitsky Announced Nobel Peace Prize)

बेलारूसचे अॅलेस बिलियात्स्की हे 1980 च्या दशकात देशातील लोकशाही चळवळी सुरु करणाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी लोकशाही आणि शांततापूर्ण विकासाला चालना देण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. तर मानवाधिकार संघटना मेमोरिअलनं रशियामधील राजकीय दडपशाही आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाची माहिती पद्धतशीरपणे संकलित केली आहे.

Ales Bialitsky
Tech : फोनमध्ये 5G चं नेटवर्क मिळत नसेल तर करा हे बदल

दरम्यान, युक्रेनची राजधानी किव्हमधील नागरी स्वातंत्र्य केंद्र मानवी हक्क आणि लोकशाहीला चालना देत आहेत. या केंद्रानं युक्रेनियन नागरी समाज मजबूत करण्यासाठी आणि युक्रेनला पूर्ण लोकशाही बनवण्यासाठी इथल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची भूमिका घेतली आहे.

Ales Bialitsky
Fake Currency Crime : इडलीवाल्याकडे 5 लाखांच्या बनावट नोटा; एकास अटक

"नोबेल विजेते त्यांच्या देशांमधील नागरी समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्याना प्रश्न विचारण्याचा आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याच्या अधिकाराचा प्रचार केला आहे. त्यांनी युद्धगुन्हे, मानवी हक्कांचं उल्लंघन आणि सत्तेचा दुरुपयोगाचं दस्तऐवजीकरण करण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. शांतता आणि लोकशाहीसाठी नागरी समाजाचं महत्त्व ते एकत्रितपणे प्रदर्शित करतात," असंही नोबेल समितीनं आपल्या घोषणेत म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com