मुंबईकरांनो पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबईत झालीये सकाळपासून पावसाची दमदार एन्ट्री...

मुंबईकरांनो पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण मुंबईत झालीये सकाळपासून पावसाची दमदार एन्ट्री...

मुंबई- निसर्ग चक्रीवादळ बुधवारी कोकण किनारपट्टीवर धडकलं. या वादळामुळे बरंच नुकसान झालं. कोकण किनारपट्टीहून हे चक्रीवादळ मुंबईत येऊन धडकणार होतं. मात्र मुंबईत पोहोचण्याआधी वादळानं दिशा बदलली आणि त्याचा वेगही मंदावला. त्यामुळे मुंबईवरील मोठं संकट टळलं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाण्यात बुधवारपासून पावसानं वेग धरला.

आज पुन्हा सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी भागात जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे शहरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागात पुढच्या तीन तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण होतं. नवी मुंबई, पनवेल भागातही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वसई-विरारमध्येही पावसानं सकाळपासून दमदार हजेरी लावली.

वसईत बुधवारपासून पावसामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी कोकण किनारपट्टीवर वादळ धडकल्यानं रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी याचा फटका बसला.

rains slashes mumbai after nisarga cyclone read important news about mumbai rains

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com