esakal | मुंबईत पावसाचा जोर ओसरताच बसू लागले उन्हाचे चटके; आज दिवसभरात इतक्या तापमानाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पावसाचा जोर ओसरताच बसू लागले उन्हाचे चटके; आज दिवसभरात इतक्या तापमानाची नोंद

मुंबईत पावसाचा जोर ओसरल्यावर दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा बसू लागल्या होता.कुलाबा येथे आज संध्याकाळ पर्यंत कमाल 30.4 अंश आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली

मुंबईत पावसाचा जोर ओसरताच बसू लागले उन्हाचे चटके; आज दिवसभरात इतक्या तापमानाची नोंद

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर ओसरल्यावर दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा बसू लागल्या होता.कुलाबा येथे आज संध्याकाळ पर्यंत कमाल 30.4 अंश आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली.तर,सांताक्रुझ येथे कमाल 31 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

सुशांत सिंहवर चित्रपट काढण्यासाठी 'इम्पा'कडे आले नावनोंदणीसाठी अर्ज

मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई,ठाण्यासह सिंधुदूर्गजिल्ह्यात पुढील शुक्रवार(ता.28)पर्यंत हलक्‍या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.तर,पालघर मध्ये उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.रायगड रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवार पर्यंत हलक्‍या सरी कोसळून शुक्रवार पासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे आहे.मुंबईत आज संध्याकाळ पर्यंत काही ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला होता.त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका जाणवत होता.

चिंताजनक! अनलॉकनंतर 'या' शहरात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

मुंबईत पुढील दोन दिवस आकाढ काही प्रमाणात ढगाळ राहाणार असले तरी तापमान 31 ते 26 अंशा पर्यंत राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
मुंबईत सांताक्रुझ येथे आता पर्यंत 2929 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.तर,कुलाबा येथे 2686 पाऊस नोंदविण्यात आला आहे.कुलाबा येथे वर्षाला सरासरी 2292 आणि सांताक्रुझ येथे 2668 मि.मी पाऊस होतो.यंदा कुलाबा येथे 117.19 आणि सांताक्रुझ येथे 109.87 टक्के पाऊस झाला आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )