esakal | वेबसीरिज, शॉर्ट स्टोरीजच्या आमिषानं राज कुंद्रानं नवोदित अभिनेत्रींना फसवलं - मुंबई पोलीस
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Kundra

"वेबसीरिज, शॉर्ट स्टोरीजच्या आमिषानं नवोदित अभिनेत्रींची फसवणूक"

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : वेबसीरिज आणि शॉर्ट स्टोरीजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने राज कुंद्रा आणि त्याच्या टीमनं नवोदित महिला कलाकारांना फसवलं, असा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. फसवणूक करुन या महिलांचे सेमी न्यूड आणि न्यूड क्लीप्स घेऊन ते विविध वेबसाईट्स आणि अॅप्सला विकायचे असा धंदा या लोकांचा सुरु होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. (Raj Kundra deceives women lure of webseries short stories Mumbai Police aau85)

या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितलं की, "राज कुंद्रा आणि त्याच्या टीमकडून फिल्म्समध्ये काम करणाऱ्या ज्या नवोदित महिला कलाकार आहेत त्यांना वेबसिरीजमध्ये किंवा एखाद्या शॉर्टस्टोरीजमध्ये चांगला ब्रेक देतो असं आमिष दाखवून ऑडिशनसाठी किंवा छोटे छोटे शॉर्ट्स घेण्यासाठी बोलावलं जायच. यामध्ये मग थोडे बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगून बोल्ड सीन्सचं पर्यावसन सेमी न्यूड आणि न्यूड शॉट्समध्ये व्हायचं. यावर अनेक महिला कलाकारांनी आक्षेपही घेतला आहे. यातीलच काही महिला कलाकारांनी याबाबत तक्रार घेऊन गुन्हे शाखेपर्यंत पोहोचल्या, त्यानंतर याप्रकरणी फेब्रुवारी २०२१मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी ९ आरोपींना अटक

या गुन्ह्याचा तपास करताना असं दिसून आलं की, अशा प्रकारे तयार केलेल्या छोट्या फिल्म्स, छोट्या क्लिप्स किंवा शॉर्ट स्टोरीज वेबसाईट्सला आणि काही मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या. याप्रकरणी यापूर्वी ९ आरोपींना अटक झाली आहे. यामध्ये निर्माता रोहा खान, गहना वशिष्ट, तन्वीर हाश्मी, उमेश कामत आणि इतरही काही आरोपींचा समावेश आहे. विविध अॅप्स आणि वेबसाईट्स हे लोक हा कन्टेट विकायचे त्यानंतर सबस्क्रिप्शन बेसिसवर याचं पुढचे व्यवहार चालायचे.

राज कुंद्राच्या मेव्हण्याच्या कंपनीचाही सहभाग

मुंबई पोलीस म्हणाले, "तपासात जी अॅप समोर आलेली आहेत याच्या तपासात हे उघड झालं आहे की, "उमेश कामत नावाचा जो व्यक्ती आहे. हा या अॅपचा इंडिया हेड होता तो राज कुंद्राच्या कंपनीत काम करत होता. याचा आणखी खोल तपास केल्यानंतर हे निष्पण्ण झालं की, राज कुंद्राची विहान नावाची जी कंपनी आहे त्यांच एका केंद्रीन नावाच्या कंपनीशी टायअप होतं. ही कंपनी लंडनस्थित आहे. राज कुंद्राचा मेव्हणा या कंपनीचा मालक आहे. या कंपनीचं हॉटशॉट नावाचं अॅपही आहे. या कंपन्या जरी लंडनस्थित असल्या तरी त्यांचा सर्व कन्टेट आणि ऑपरेशन तसेच अकाउंटिंग मुंबईतील विहान कंपनीतून व्हायचं. याचा खोल तपास करत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. कुंद्रा आणि त्याच्या टीमचे व्हॉट्सअप चॅट, ई-मेल सापडले आहेत. तसेच त्यांच्या अकाउटिंग शिट्सही सापडल्या आहेत. हॉटशॉटवर प्रसारित केलेल्या चित्रफिती देखील सापडल्या आहेत. काल कोर्टाची परवानगी घेऊन त्यांच्या ऑफिेसस सर्च केल्यांनतर या सर्व गोष्टी सापडल्या. त्यामुळे तपासानंतर राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रानन थॉर्प या दोघांना काल रात्री अटक केली आहे.

इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास होणार

पुढचा तपास सुरु असून हॉटशॉटवर पोर्नोग्राफी कंटेट असल्यामुळेच अॅपल स्टोअरने जून २०२० आणि गुगलने हे अॅप डाऊन केलं आहे. यापुढे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे हा तपास करण्यात येत आहे.

loading image