राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीकडून पुण्यात गुंतवणुकीचं आमिष; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj shilpa

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीकडून पुण्यात गुंतवणुकीचं आमिष; गुन्हा दाखल

मुंबई : शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. कारण फसवणूकप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बरई नामक एका व्यक्तीनं शनिवारी वांद्रे पोलिसांत या दोघांविरोधात तक्रार दिली होती.

तक्रारीत बरई यांनी आरोप केला आहे की, जुलै २०१४ SFL फिटनेस कंपनीचे संचालक काशिफ खान यांच्यासह शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि इतर लोकांनी त्यांना नफा कमावण्यासाठी त्यांच्या कंपनीत सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

तक्रारदारानं पुढे म्हटलंय की, SFL फिटनेस कंपनीनं या बदल्यात त्यांना फिटनेस कंपनीची फ्रान्चायझी देण्याची आणि पुण्यातील हडपसर आणि कोरेगाव पार्क परिसरात जीम आणि स्पा सेंटर सुरु करण्याची परवानगी दिली होती. पण हा सौदा प्रत्यक्षात आला नाही, असंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, तक्रारदारानं त्यानं गुंतवलेले पैसै परत मागितले तर त्याला धमकावण्यात आलं, असं पोलिसांनी तक्रारीतील मजकूरानुसार माहिती दिली. यानंतर वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ४२० (फसवणूक), १२० ब (गुन्हेगारी कट), ५०६ (गुन्हेगारी धमक्या) आणि कलम ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top