ठाणे सत्र न्यायालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची २००८ च्या जुना प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सकाळी अकरा वाजता राज ठाकरे कोर्टात हजर झाले न्यायाधीशांनी थेट त्यांना विचारले की तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की गुन्हा मान्य नाही.