
डोंबिवली : राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णयास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध करताच शासनाने हा निर्णय मागे घेतला. ठाकरे बंधूंच्या या विजया निमित्ताने शनिवारी मुंबईत विजयी सभा होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस 'मराठी' बोलतांना पाहायचं आहे... मग ही सुरुवात आहे ! असे संदेश देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जाहीर आमंत्रण देणारे बॅनर डोंबिवलीत लागले आहेत.