"अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत" : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

निजामुद्दीनच्या मरकज कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी सडकून टीका

मुंबई : “निवडणुकीच्या वेळी कुणाला मतदान करायचे, हे सांगत फिरणारे मुल्ला-मौलवी आता कुठे गेले, आता यावेळी त्यांना लोकांना घरात बसा असे सांगता येत नाही. या लोकांना आतूनच पाठिंबा असतो. संशय निर्माण करणारी परिस्थिती आज मुस्लीम समाज निर्माण करतोय. मग उद्या जर सरकारने किंवा कुठल्या पक्षाने भूमिका घेतली नंतर या लोकांनी दोष द्यायचा नाही”, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दिल्लीत निजामुद्दीनच्या मरकज कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे कार्यक्रम करने योग्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

मोठी बातमी -  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र...

अमेरिकेत गेल्या काही दिवसात 30 ते 32 लाख लोकांनी बंदूका विकत घेतल्या. उद्या समाजा कोरोना वाढला, लोक रस्त्यावर आले आणि लुटालूट सुरु झाली तर संरक्षणासाठी त्यांनी बंदूका घेतल्या. भारतामध्ये ही परिस्थिती नाही. मात्र आज अनेक ठिकाणी लोक पोलिसांना शिव्या देतात. हे चूक आहे. 

अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत

“दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांच्यावर कसला उपचार करताय? त्यांचा कुठलातरी वेगळा स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांच्यावरील सर्व उपचार बंद करावे. त्यांना याही दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचे असेल तर त्यांना फोडून काढायला पाहिजे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

मोठी बातमी - महाराष्ट्रातील पहिलंच शहर जिथं भाजी मार्केट्स बंद, आयुक्तांनी घेतला तडकाफडकी निर्णय

“नोटांना आणि भाज्यांना थूंकी लावणे, नर्सेससमोर नग्न फिरणे, लोकांच्या अंगावर थुकणे असे प्रकार हे करत आहेत. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे”, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, लॉकडाऊन देशात काही दिवसांसाठीच आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशार राज ठाकरे यांनी दिला.

फक्त सुशिक्षित असून चालत नाही सुज्ञही असावे लागते

लोक अशाप्रकारे एकत्र आले आणि कोरोना वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढतच राहणार. आज सामाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. फक्त सुशिक्षित असून चालत नाही सुज्ञही असावे लागते. ही वेळ सरकारवर आरोप करण्याची नाही, आपण शिस्त पाळली नाही तर मोठे आर्थिक संकट येईल. पंतप्रधान आले तेव्हा ते काहीतरी बोलतील असे वाटले होते.

मोठी बातमी -  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वरळीकरांचं खुलं पत्र...

पंतप्रधानांनी सागितले की, 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्ता पेटवायचे. पेटवतील लोक. नाहीतरी घरात बसून करतील काय? हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, त्याच्याने परिणाम होत असेल तर कोरोनावर त्याने परिणाम होवो. परंतु, नुसत दिवे घालवून, मेणबत्या पेटवून, टॉर्च लावून यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी असता तरी लोकांना समाधान वाटले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Raj thackeray condemns act done by tablighi jamaat at hospitals read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj thackeray condemns act done by tablighi jamaat at hospitals read full story