पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे 'मौन की बात' : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

मुंबई : 'पत्रकारांना सामोरं जायला आपले पंतप्रधान घाबरतात हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर मोदी आले तरी कशाला? पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरतात याचे उत्तर त्यांनी द्यावे.' अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शिवाजी पार्कमधील आंबा महोत्सवात त्यांनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. गुरुवारी पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये मोदी यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न दिल्याने मोदी यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

राज ठाकरे ट्विटरच्या माध्यमातून देखील मोदींना टोमणा मारला आहे. राज यांनी "पंतप्रधानांची पत्रकार परिषद...मौन की बात" आशयाचे ट्विट करून मोदींना टोला लगावला. 

Web Title: Raj Thackeray criticizes PM Narendra Modi on Press Conference