esakal | राज ठाकरेंच्या सुनबाईंना कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray-Mitali-Family
राज ठाकरेंच्या सुनबाईंना कोरोनाची लागण
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमित ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राज ठाकरे यांची सून आणि अमित यांची पत्नी मिताली ठाकरे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल मिळाला असून मिताली या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सध्या अमित ठाकरे हे कोरोनावर उपचार घेण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत, पण मिताली मात्र होम क्वारंटाइनच असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: कारागृहात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे कोरोनाबाधित असल्याचं निदान झालं. त्यानंतर सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केले जात आहेत. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले असून घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. मात्र त्यांच्या पत्नी मिताली यांना कोरोनाची लागण झाली आहे.