esakal | कारागृहात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण

बोलून बातमी शोधा

Indrani-Mukherjee
कारागृहात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण
sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: महाराष्ट्रात शीना बोरा हत्याकांड खूप गाजलं. या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर तिची फारशी चर्चा नव्हती पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या ती भायखळ्याच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. येथे शिक्षा भोगत असतानाच इंद्राणीला कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांपर्यंत पोहोचला. भायखळा तुरुंगात तब्बल 39 महिला कैदी कोरोनाबाधित झाल्या. यातच इंद्राणी मुखर्जीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे वाढती संख्या लक्षात घेता कारागृह विभागाने राज्यातील 36 विलगीकरण केंद्र पुन्हा ताब्यात घेण्यास सुरूवात केली असून त्यातील 14 केंद्र ताब्यात घेण्यास कारागृह विभागाला यश आले आहे.

वाढत्या कोरोना महामारीचा मोठा फटका मुंबईला बसला असून शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण मिळून लागल्याने प्रशासनाच्या सोयी सुविधांवर ताण पडू लागला आहे. अशातच भायखळा येथील महिला कारागृहातील 39 महिला कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याचे उघड झाल्यानेएकच खळबळ माजली आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत.त्यामुळे तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भायखळा येथील महिला कैद्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज, जीटी आणि जेजे रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भायखळा जेलची 462 कैद्यांची क्षमता आहे. यात 262 महिला व 200 पुरुष कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था आहे. मात्र सद्यस्थितीत या जेलमध्ये 306 महिला व 203 पुरुष कैंद्यांना ठेवण्यात आले आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात 10 दिवसांपूर्वी एकाच वेळी 28 कोरोना रुग्ण आढळले होते.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह विभागाने विलगीकरण केंद्र स्थापन करून प्रथम कैंद्यांना तेथे विलगीकरण करण्यात यायचे. त्यानंतर विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर चाचणी करून त्यांना कारागृहात घेण्यात यायचे. त्यातील बहुतांश विलगीकरण केंद्र या शाळा अशवा सभागृह होती. अशी 36 विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. कोरोना कैद्यांचा आकडा कमी झाल्यामुळे हे विलगीकरण केंद्र पुन्हा संबंधीत संस्थांच्या ताब्यात देण्यात आली होती. पण सध्याची वाढती संख्या लक्षात घेऊन ही केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यातील 14 केंद्र कारागृह विभागाला मिळाली आहेत.