सात जन्म एकच पती काही चॉईस आहे की नाही, महिलादिनी राज यांची मिश्किल टिप्पणी! - Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray

Raj Thackeray : सात जन्म एकच पती काही चॉईस आहे की नाही, महिलादिनी राज यांची मिश्किल टिप्पणी!

आज महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यक्रमाला संबोधित केले. महिलांसाठी एकचं दिवस का साजरा करायचा हे मला आजपर्यंत कळत नाही. उद्या काय करायचं, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मला वटपोर्णिमेला दोरी बांधणाऱ्या महिलांना पाहून वाईट वाटतं. त्यांना मनातून उलटे बांधायची इच्छा असते. सात जन्म हाच पती मिळू द्या हे कोणी सांगितल. अरे काही चॉईस आहे की नाही. एकच सात-सात वेळेला कशाला घेऊन बसायचे", अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे जाणीवा मेलेल्या असतात. आपण आज जे उभे आहोत. महिला दिन साजरा करत आहोत. आपल्याला समाजामध्ये जे स्थान आहे. या सगळ्या गोष्टींच्या मागे अनेक महिलांचे कष्ट आहे. त्यामुळे मान मिळतो

"महिलांना सहकार्य करण्यास आम्ही आहोतच. पण महिलांनी पुढाकार घ्यावा. अनेक गोष्टी आपण व्हाट्सअपच्या नादात विसरलो आहोत. मला आठवते आमची आई, माँ गच्चीवर पापड, कुरडया वाळू घालायच्या पण आता लिज्जतनं इज्जत काढल्यामुळे फारसे कुणी त्याच्या वाट्याला जात नाही", असे राज ठाकरे म्हणाले.

"मी जातीवाद काय मानत नाही. कायस्थ पुस्तक म्हणजे काय असतं हे मला माहिती नाही. मला त्यातलं काही कळत नाही. त्यात विशेष गोष्ट म्हणजे त्यात खाद्य संस्कृती होती. मी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. प्रत्येक जातीने आता खाद्य संस्कृती जपली पाहिजे. त्या आजीने ती संस्कृती पुस्तकरुपानं सांगितली पाहिजे. पुढच्या पिढीला हे सगळं कसं कळणार", असे राज ठाकरे म्हणाले.