esakal | काळजी घ्या, फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ; राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

काळजी घ्या, फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ - राज ठाकरे

फेरीवाल्याने केलेल्या चाकूहल्ल्यात कल्पिता पिंपळे यांना दोन बोटे गमवावी लागली आहेत. त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

काळजी घ्या, फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ - राज ठाकरे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे पालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. फेरीवाल्याने केलेल्या चाकूहल्ल्यात कल्पिता पिंपळे यांना दोन बोटे गमवावी लागली आहेत. त्यांच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तुटलेली बोटे ज्युपिटर रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून जोडली. पुढच्या ४८ तासात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेबाबत सविस्तर माहिती समजू शकेल. दरम्यान, राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन त्यांना काळजी घ्या असं सांगत फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ असं म्हटलं आहे.

कल्पिता पिंपळे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी म्हटलं की, जे काही घडलं आहे त्याचं दु:ख आहे पण काळ सोकावतोय. अशा प्रकारची हिंमत ठेचण्याची गरज आहे. याप्रकरणी पोलिस कारवाई करत आहेत आणि न्यायालय योग्य तो न्यायनिवाडा करेल. न्यायालय गुन्हेगारांना कठोर शिक्षा देईल असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा: 'सरकारचा ‘रिमोट’ माझ्याच हातात', मुख्यमंञ्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला इशारा

फेरीवाल्याने कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये त्यांची दोन बोटे तुटून रस्त्यावर पडली होती. पालिका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बोटांचे तुकडे घेत कल्पिता पिंपळे यांना वेदांत रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथून कल्पिता पिंपळे यांनी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांनी सात तासांची यशस्वी अशी शस्त्रक्रिया केली. सध्या पिंपळे यांची प्रकृती स्थिर आहे.

loading image
go to top