esakal | 'सरकारचा ‘रिमोट’ माझ्याच हातात', मुख्यमंञ्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena udhav thakre

'सरकारचा ‘रिमोट’ माझ्याच हातात', मुख्यमंञ्यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला इशारा

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे अर्थात, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असले तरी या सरकारचे ‘रिमोट’ आपल्याच हाती असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केले. ‘हातातला रिमोट सोडत नाही असे सांगत, रिमोट ही वडिलोपार्जित देणगी असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी रिमोट तिन्ही पक्षांकडे असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून नोंदविण्यात आल्या. (Mumbai News)

ठाणे येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. कार्यक्रमाची सुरवात होताच आमदार प्रताप सरनाईक प्रकल्पाचे उदघाटन करण्याची विनंती करीत ‘साहेब, तिथे रिमोट आहे का, अशी विचारणा केली. त्यावर क्षणाचाही विलंब न करता ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ‘‘हातातला रिमोट सोडत नाही. रिमोट ही वडिलोपार्जित देणगी आहे,’’ असे ठाकरे यांनी सरनाईक यांना सांगितले.

हेही वाचा: कारोना नियमांचं पालन, काही राज्यातील शाळेत पुन्हा 'घंटानाद'

विरोधकांसह मित्रपक्षांवरही कुरघोडी

मुख्यमंत्री ठाकरे हे आक्रमकपणे विरोधकांना उत्तरे देत आहेत. तेवढेच नाही तर मित्रपक्षांवर कुरघोडी करीत सरकारचे रिमोट आपल्याकडेच असल्याचे ठाकरे यांनी दाखवून दिले.

loading image
go to top