
बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाहतूक कोंडीच्या विषयावर चर्चा केली असंही त्यांनी सांगितलं. बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालाबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी थेट उत्तर देणं टाळलं.