esakal | राज ठाकरेंचा विद्यार्थीधर्म! शिक्षिकेच्या वृद्धाश्रमाला लगेच दिला मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरेंचा विद्यार्थी धर्म! शिक्षिकेला दिला मदतीचा हात

राज ठाकरेंचा विद्यार्थी धर्म! शिक्षिकेला दिला मदतीचा हात

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई: मागच्या आठवड्यात आलेल्या 'तौक्ते' वादळाने अनेकांचं बरंच काही हिरावून घेतलं. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज (Raj thackeray)ठाकरे यांना शिकविणाऱ्या आणि घडविणाऱ्या शिक्षिका सुमन रणदिवे यांनादेखील या वादळाचा फटका बसला. सुमन रणदिवे (suman randive) या सध्या वसई परिसरातील सत्पाळा गावातील न्यू लाईफ केअर या वृद्धाश्रमात (shelter home) गेल्या एक वर्षापासून राहत आहेत. सोमवारी आलेल्या वादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले. या संदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता सुमन रणदिवे यांच्या वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. (Raj thackeray mns help suman randive madam old age shelter home it hit in taukte cyclone)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी स्वत: जातीने लक्ष घातले आहे. मनसेकडून वृद्धाश्रमाला ४० गाद्या आणि २५ पत्रे पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय तुटलेला वृद्धाश्रमाचा काही भाग बांधण्यासाठी मनसेकडून रेती आणि अन्य सामानाचीही मदत करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी स्वत: रणदीवे मॅडमच्या संपर्कात आहेत. आतापर्यंत त्यांचे पाच ते सहा वेळा फोनवरुन बोलणे झाले आहे. तौक्ते वादळामुळे फळबागा, शेतीप्रमाणे अनेकांच्या घरांचेदेखील नुकसान झाले.

हेही वाचा: मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...

सुमन रणदिवे यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध लोक येथे राहतात. या वृद्धाश्रमात मुके, बहिरे असेही वृद्ध असल्याने वादळ आलं त्या रात्री आश्रम चालक राजेश मोरो, त्यांची पत्नी, मुलगी यांच्यासह सर्वजण रात्रभर जागे होते. वृद्धाश्रमातील वृद्धाना काही होऊ नये म्हणून त्यांनी स्वत: लक्ष घातलं. पण अचानक आलेल्या वादळामुळे त्यांना काहीही करायला वेळ मिळाला नाही.