esakal | मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...

sakal_logo
By
वैदही काणेकर

मुंबई: मुंबईतले कोरोनाचे आकडे (corona numbers) आटोक्यात आले आहेत, असं वाटत असलं तरी, आम्ही ते पूर्ण कसे घटतील याकडे लक्ष देतोय. अजूनही 1300 ते 1400 केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) म्हणाले. ते आज वरळीत आले होते. आदित्य ठाकरे यांनी आज 'तोत्के' चक्रिवादळात (tautke cyclone) वरळीत झाड पडून मृत्यू झालेल्या संगीत खरात यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संगीत खरात यांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली होती. युवासेनेनं या अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. (To make unlock mumbai aditya thackeray reaction)

लॉकडाउन बद्दल म्हणाले...

लॉकडाउनबद्दल आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उघडला, तेव्हा ११ हजारच्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊन बद्दल आताच काही सांगू शकतं नाही. पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: २४ तासात भाजपाने शिवसेनेला दिला झटका, सेनेचे नगरसेवक फोडले

लसीकरणाबद्दल म्हणाले...

लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जो समन्वय असावा लागतो तो आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या तशी आमचीही आहे. पण जशीजशी लस उपलब्ध होतेय तस लसीकरण केलं जातंय. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त लसी दिलेल्या आहेत. काही गाव तर अशी आहेत की, पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत. मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरही आहे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असत या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबईचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील विसंवादाचा स्फोट होईल'

शिवाजी पार्क मैदानाबद्दल म्हणाले....

छत्रपती शिवाजी पार्कमध्ये गेल्या दीड वर्षांपासून आम्ही मेहनत करतोय. मैदान हिरवेगार कसे राहील याकडे लक्ष देतोय. मुलं खेळतात पण मैदानावरची धूळ उडत असते. त्यामुळे ती नाकातोंडात जाऊन त्रास होतो. त्यावर आम्ही काम करतोय. ग्रीन हार्वेस्टिंगवर आम्ही लक्ष देतोय, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.