Raj Thackeray: गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे सज्ज; जाणून घ्या कशी केलीये तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे |Maharashtra Navnirman Sena's Gudipadwa meeting has been organized
Raj Thackeray gudi padva
Raj Thackeray gudi padva sakal

Mns Dadar Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळावा मंगळवार ९ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मनसे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Raj Thackeray gudi padva
Kolhapur MNS : 18 वर्षे झाली तरी, मनसेची अस्तित्वासाठीच लढा; स्थानिक पातळीवर ताकदीच्या नेतृत्वाची गरज!

मनसेचे माहीम विधानसभा विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांना सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सभा स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पिण्याचे पाण्याचे टँकर, फायर मशीन, फिरते शौचालय, कार्डीयाक ऍम्ब्युलन्स, व्हॅनिटी व्हॅन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिंदुजा व सुश्रुषा रुग्णालयात काही बेड आरक्षित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray gudi padva
Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

सभा स्थळी पोहचताना तसेच पोहचल्यावर नागरिकांना कोणतीही अडचण उदभवू नये याकरिता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मनसेचे १०० सुरक्षारक्षक, ५०० स्वयंसेवक व १०० वोर्डन नेमण्यात आले असून सर्व ड्रॉप पॉईंट वरून सभा स्थळी पोहचण्यासाठी ५० बीएसटी शटलची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय संबोधणार, कोणते सुतोवाच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आणि त्यासाठी मनसेने योग्य अशी खबरदारी घेतली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

Raj Thackeray gudi padva
Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com