Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

Mns Raiway News: तेजस एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना वाचण्यासाठी मराठी वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Mns Railway News: मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या तक्रारीनंतर मुंबईतून सुटणाऱ्या तेजस एक्स्प्रेससह अन्य रेल्वे गाड्यांमध्ये आता प्रवाशांना मराठी वृत्तपत्रे वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.(railway marathi newspaper news)

दोन दिवसांपूर्वी नितीन सरदेसाई तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना त्यांना मराठीऐवजी इंग्रजी वृत्तपत्र देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमधून २८ फेबुवारी २०२४ रोजी मनसे नेते नितीन सरदेसाई प्रवास करत होते. (maharashtra political News)

Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!
Shivsena-MNS मध्ये Kalyan Loksabha मतदारसंघात मनोमिलन? Dr. Shrikant Shinde, Raju Patil एका मंचावर

त्यांनी दादर स्थानकावरून तेजस एक्स्प्रेस पकडली. सरदेसाई रत्नागिरीपर्यंत प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना वाचायला इंग्रजी वृत्तपत्र देण्यात आले. त्यानंतर सरदेसाई यांनी रेल्वेच्या कारभावर नाराजी व्यक्त करत मराठी भाषेला कसे डावलले जाते यासंदर्भात स्वतःचा व्हिडीओ तयार करत त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला होता.(Maharashtra News)

Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!
Nashik MNS News : मनसेमध्ये राजीनामा नाट्य! वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांची मनधरणी

सरदेसाई यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच आयआरसीटीसीने याची दखल घेत तत्काळ मराठी वृत्तपत्रे न दिल्याबद्दल संबंधित ट्रेन ऑपरेटरला ताकीद देण्यात आली आहे. त्यानंतर तेजस एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना वाचण्यासाठी मराठी वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.(mns news)

Mns News: मनसेच्या तक्रारीनंतर आता रेल्वेत मराठीला वाव; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!
MNS News: आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com