esakal | "सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा माणूस"
sakal

बोलून बातमी शोधा

"सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा माणूस"

मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?

"सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा माणूस"

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलनं केली जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून थेट ठाकरे सरकारला घेरलं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली? हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत राज्यातील हलचालीवर आपलं मत व्यक्त केलं. 

हेही वाचा : तो ई-मेल माझाच, मुख्यमंत्री कार्यालयाला परमबीर सिंग यांचं स्पष्टीकरण 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. तसेच सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा माणूस असल्याचं यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सचिन वाझेंना कोण घेऊन गेलं होतं? असा प्रश्नही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला. अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय सगळेच असा विचार करत होतो की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात. पण, बॉम्ब पोलीस ठेवतात, असं आपण कधी ऐकलेलं नाही. यात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? , अशी टीका राज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

हेही वाचा : परमबीर सिंग यांचा 'लेटरबॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं संपूर्ण पत्र वाचा मराठीत

गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईप्रमाणे इतर पोलिस आयुक्तांकडे किती मागणी केली हे बाहेर आलं पाहिजे. या प्रकरणावरुन अनिल देशमुख यांची चौकशी होणं गरजेचं आहे. गृहमंत्र्यावर झालेले आरोप, किंवा वाझे यांची दररोजची होणारी चौकशी. या सर्व प्रकरणामुळे मुळ प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. मुळ मुद्दा हा आहे की, अंबानींच्या घराबाहेर ठेवलेले जिलेटिन आले कुठून? पोलीसांना बॉम्ब ठेवायला सांगितलं ही घटना क्षुल्लक नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 
 

हेही वाचा : महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा; परमबीर सिंग यांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत.  आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं?  ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?

loading image