Raj Thackeray questions BJP over unopposed elections
esakal
Raj Thackeray : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असल्याचं दिसून येत आहे. यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. उमेदवारांना प्रलोभनं देऊन बिनविरोध निवडणुका होत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बिनविरोध निवडणुकांवरून भाजपाला सुनावलं आहे.