
Raj Thackeray
esakal
Maharashtra Politics: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील गोंधळावरून केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. काल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींशी आणि आज राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींशी भेट घेतल्यानंतर त्यांनी ही खंत व्यक्त केली. निवडणूक आयोग मतदार यादी राजकीय पक्षांना दाखवतच नाही, यामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.