

Raj Thackeray gestures during his speech while commenting on religious narratives, unemployment, and India’s economic situation
esakal
पुणे : “आपण धर्माधर्माच्या पलीकडे माणूस म्हणून उभे राहिले पाहिजे. धर्माचा अभिमान असला पाहिजे; मात्र धर्मांध असून चालणार नाही,” असे सांगत राज ठाकरे यांनी सध्याच्या सामाजिक वातावरणावर भाष्य केले. सोशल मीडिया, टेलिव्हिजन आणि इतर माध्यमांतून सातत्याने विशिष्ट प्रकारचा राग निर्माण केला जात असून, त्यामुळे नागरिकांचे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला.