वाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझा उद्देश नाही असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या आवर्जून म्हटलंय.

मुंबई - राज्य सरकारने महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु करावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर एक तोडगा म्हणून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे वाईन शॉप्स सुरु करण्याची मागणी केलेली आहे.

राज्याचा महसूल सुरु ठेवण्यासाठी काही व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स सुरु ठेऊन राज्याच्या महसुलाची तजबीज करता येऊ शकते म्हणून कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीये. दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझा उद्देश नाही असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या आवर्जून म्हटलंय.

मोठी बातमी - मुंबई पुण्यातील 'कोरोना' दिल्लीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक शक्तिशाली ? ICMR चे शास्त्रज्ञ म्हणतायत...

 

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्रातील लहान हॉटेल्स, पोळी भाजी केंद्र, लहान खानावळी किंवा राईस प्लेट देणाऱ्या खानावळी सुरु कराव्यात अशाही काही बाबी सुचवल्यात. राज्याची सध्याची परिस्थिती पहिली तर राज्यात PPE किट्स ची कमतरता आहे, अनेकांना वेळेवर जेवण मिळत नाहीये, अनेकांचे सध्याच्या परिस्थिती हाल होतायत.  

मोठी बातमी -  ३ मे नंतर काय होऊ शकतं ? दुसऱ्या लॉक डाऊन नंतर तिसरा लॉक डाऊन ?

अशात राज्याच्या तिजोरीत हवे तेवढे पैसे नाहीत. राज्याच्या तिजोरीत पैसे जमणे गरजेचं आहे. वाईन शॉप्सच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत महसूल यायला सुरवात होऊ शकते. म्हणून वाईन शॉप सुरु करा अशी महत्त्वाची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.   

raj thackeray suggest cm uddhav thackeray to reopen wine shops


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray suggest cm uddhav thackeray to reopen wine shops